about-us
Happy Gudi Padwa

Happy Gudi Padwa

भारतीय हिंदू धर्मानुसार युग पद्धती सुरू आहे. एकूण युगे चार आहेत. सत्य, त्रेता, द्वापार आणि कलियुग. त्यात कलीयुगाच्या आरंभापासून ५१२३ वर्ष काल संपून आता कलियुगात ५१२४ वर्ष सुरू झाले आहे. गुढीसाठी वापरणारा तांब्या/कलश स्वच्छ धुऊन, पुसून घ्या. त्या कलशावर कुंकूने स्वास्तिक काढा. त्यासह हळदीचाही वापर करा. गुढी उभारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काठीला वेलू काठी असे म्हटले जाते. ही काठीही स्वच्छ करुन ठेवा. त्याला रेशमी वस्त्र बांधा आणि त्यावर कलश ठेवा. गुढीला कडुलिंब, आंब्याची पाने बांधा. सोबत साखरेची माळ देखील लावू शकता. ज्या जागी गुढी उभारणार आहात, तेथे रांगोळी काढू शकता. अंघोळ केल्यानंतर गुढी तयार करावी आणि हळद, कुंकू, फुले वाहून तिची पूजा करावी. ब्रह्मदेवाने या दिवशी विश्वाची रचना केली अशी आख्यायिका प्रचलित आहे. यामुळे गुढीला ब्रह्मध्वज असेही म्हटले जाते. शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी.. कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी.. तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे.. आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे.. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!

about-us
;